• Facebook Basic Black

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

Oct 25, 2017

'अवघडल्याची कळ'

1 comment

Edited: Oct 25, 2017

=============================

तुझं वाऱ्यासारखं पसरणं

हवी तिकडे वाट काढणं

भळभळणारी माझी जखम म्हणतेय

'भीती वाटतेय मला'...

 

छिलून घेतलं जातंय अस्तित्व माझं

बेदकार असं विस्तारनं तुझं

भीती वाटतेय...

आता संपून जाईल का सारं?

 

माझ्या कुशीत विसावयाला

सौंदर्यच भुरळ घालतं तुला

उरत नाही सीमा तुझ्या हव्यासाला...

आता मदतीला बोलावू कोणाला?

 

सोबत आणल्यास विकृती

हीच का तुझी 'नवनिर्मिती'?

खनिजांसाठी उदरावर घातलास घाव...

एक-एक तुकड्याचा सोन्याहूनही मोठा भाव!

 

तुझ्या विद्रुप तलवारीनं

होतोय माझ्या शरीराचा

एक-एक धागा रिता

अवघडल्याची कळ आता मात्र सोसवेना...

 

बघू नको माझा अंत

घळघळ ओघळणारे अश्रू

करतील क्षणार्धात तुझ्या

प्रीतीचे मजले भुईसपाट

 

परत वक्तव्य करशील वायफळ

हा तर ऍक्ट ऑफ गॉड

पण विसरू नकोस 

हे सारे कर्माचेच फळ...

 

म्हणून मला भीती वाटते

अनपेक्षित बदलाची, तुझ्यावर बेतण्याची

आता तुला सावरायला हवं

मागं वळून पाहायला हवं!

 

       - प्रभाव

©(प्रमोद भाऊसाहेब वडवकर)

मो.बा. 9545712480

 

 

 

New Posts
  • कोण होतात तुम्ही क्रांतिकारक आम्हाला माहित नाही  तुम्ही वेडे होतात का ? की इंग्रजांनीच तुम्हाला तस सांगितलेलं ! तुम्ही क्रांति केलीत हे खर पण  त्याचा फायदा कोणाला  आमच्याकडे उत्तरही नाही  आणि उपाय तर नाहीच नाही   तुमची आठवण येते आम्हाला  इतिहासाच पुस्तक हातात घेतल्यावर.... पण तीसुद्धा आता दुर्मिळ झालीयेत  कारण अभ्यासक्रमातूनही तुम्हाला वगळलं जातायं.... चौकाचौकातील तुमचे पुतळे पाहून  मनाला थोड़ी शांती मिळते.... पण  मनाची घालमेल  आजच्या तरुण पिढीच्या हास्यात दिसते.... तुम्ही अहोरात्र झटलात  दारुगोळीही बनवलेत  पण  आजची दारुही वेगळी आणि गोळेही वेगळे  कारण त्या गोळ्यांचे आता अड्डे झालेत.... भगतसिंग तुम्ही म्हणाला होतात  "मेरा रंग दे बसंती चोला" पण आता आम्ही म्हणतो "हमारा रंग दे बसंती चोला" आणि तुम्हाला निर्विवादपणे विसरूनही जातो कारण स्वार्थ आमच्या अंगाला गोमेसारखा चिकटलाय... भगतसिंग तुम्ही गाणचं बदलुन टाका  म्हणजे गांधीजी तुम्हाला ओरडणार नाहीत ! जाता जाता सुखदेव,राजगुरूंना  माझा एक निरोप दया  त्यांना म्हणावं एवढी जिवलग मैत्री करू नका बाबांनो ! फुकट जिव जाईल आणि हातात फक्त शूंन्य येईल  त्यापेक्षा त्यांना सांगा स्वार्थी व्हा आणि मस्त रहा.. "स्वराज्य है माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  अशी घोषणा तुम्ही तुम्ही दिलीत खरी टिळक  पण आज स्वराज्यही नाही आणि हक्कासाठी कोणी भांडतही नाही  परिणामी विशेष अस मिळविण्याच्या भानगडित  आम्ही पडत नाही.... टिळक तुम्ही आणि गांधीजी "patch-up" करा लवकर तुमच्या नावाखाली इथ असंतोष माजलाय ..... कारण पैशांच्या नोटातही आता  जहालपणा दिसू लागलाय..... म्हणून सांगतो क्रांतिकारकांनो  तुम्हाला वेड लागलाय का ?   तुम्ही भूतकाळात परत जा  आणि इतिहासच बदला ! म्हणजे भारत परत पारतंत्र्यात जाईल  -पंकज धुमाळ
  • आईच्या गर्भात असताना प्रत्येक मुलीला प्रश्न पडत असावा। मी का येवू जन्माला? राक्षस तैनात पृथ्वीवरती मला मारायला। काळजावरती दगड ठेवून जन्म जरी घेतला समाजाचे जावू द्या आई-वडील स्विकारतील का मला? आई ही एक स्त्री आहे ती हे का विसरते समाजाच्या बंधनाला बळी पडून स्त्रीभृणहत्या करण्यास प्रवृत्त का होते? परक्यांचे जावू द्या आपलेच झाले आपले वैरी समाजाची विकृती किती निकृष्ट दर्जाला गेली मुलाला वंशाचा दिवा मुलीला परक्याचे धन मानू लागली। मग, का येवू नये प्रश्न मनाला मी का येवू जन्माला? ना दिसत कुठे जिव्हाळा ना कुठे आपुलकी जो-तो पेटू लागला आपल्या वंशाचा दिवा। हिम्मत करून जन्म घेतला लग्नात हुंड्यासाठी बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला। कर्ज फेडता-फेडता मृत्यूला टेकला हे पाहण्यापेक्षा प्रश्न पडतो मनाला मी का येवू जन्माला? मी का येवू जन्माला? लेखक-अमीत पालवे
  • वाट तुझी पाहताना मन आतुर होते , तू समोर येताच हळूच हसू येते , डोळ्यात तुझ्या पाहताना हळूच लाज गाली येते , कशी सांगू तुला मी आठवण तुझीच येते , दूर तू जाताना मनात काहूर माजते , तू जवळ येताच मन हुरहूरते , का असे होते हे कळेना ना मला , हे कोडे उलगडून सांगशील ना मला , सतत तू जवळ असावा असे वाटते मला , वाट तुझी पाहताना मन आतुर होते , तुला पाहताच मी वेडी होते .                                                      -   प्राजक्ता निकुरे