• Facebook Basic Black

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

Dec 23, 2017

" जमेल ना तुला कधी .." [गझल]

0 comments

 

जमेल ना तुला कधी चेहऱ्यास वाचणे

असेच चालणार हे मुखवट्यास बदलणे ..

 

विचार येत सारखे राहती तुझेच का 

अशक्य मग मनातुनी पूर्वप्रेम विसरणे ..

 

तुझा ग चेहरा किती बोलतोय छानसा 

दुधात शर्करा जणू त्यात सहज लाजणे ..

 

उगाच भाव बदलशी बघत आरशात तू 

खुळावते तुझे असे आरशात पाहणे ..

 

उनाड मन असे कसे भरकटे तुझ्याकडे 

पतंग ज्योत भेट का ना कधीच समजणे ..

.

 

- - - विजयकुमार देशपांडे, सोलापूर 

मो. ९०११६६७१२७ 

New Posts
  • कोण होतात तुम्ही क्रांतिकारक आम्हाला माहित नाही  तुम्ही वेडे होतात का ? की इंग्रजांनीच तुम्हाला तस सांगितलेलं ! तुम्ही क्रांति केलीत हे खर पण  त्याचा फायदा कोणाला  आमच्याकडे उत्तरही नाही  आणि उपाय तर नाहीच नाही   तुमची आठवण येते आम्हाला  इतिहासाच पुस्तक हातात घेतल्यावर.... पण तीसुद्धा आता दुर्मिळ झालीयेत  कारण अभ्यासक्रमातूनही तुम्हाला वगळलं जातायं.... चौकाचौकातील तुमचे पुतळे पाहून  मनाला थोड़ी शांती मिळते.... पण  मनाची घालमेल  आजच्या तरुण पिढीच्या हास्यात दिसते.... तुम्ही अहोरात्र झटलात  दारुगोळीही बनवलेत  पण  आजची दारुही वेगळी आणि गोळेही वेगळे  कारण त्या गोळ्यांचे आता अड्डे झालेत.... भगतसिंग तुम्ही म्हणाला होतात  "मेरा रंग दे बसंती चोला" पण आता आम्ही म्हणतो "हमारा रंग दे बसंती चोला" आणि तुम्हाला निर्विवादपणे विसरूनही जातो कारण स्वार्थ आमच्या अंगाला गोमेसारखा चिकटलाय... भगतसिंग तुम्ही गाणचं बदलुन टाका  म्हणजे गांधीजी तुम्हाला ओरडणार नाहीत ! जाता जाता सुखदेव,राजगुरूंना  माझा एक निरोप दया  त्यांना म्हणावं एवढी जिवलग मैत्री करू नका बाबांनो ! फुकट जिव जाईल आणि हातात फक्त शूंन्य येईल  त्यापेक्षा त्यांना सांगा स्वार्थी व्हा आणि मस्त रहा.. "स्वराज्य है माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  अशी घोषणा तुम्ही तुम्ही दिलीत खरी टिळक  पण आज स्वराज्यही नाही आणि हक्कासाठी कोणी भांडतही नाही  परिणामी विशेष अस मिळविण्याच्या भानगडित  आम्ही पडत नाही.... टिळक तुम्ही आणि गांधीजी "patch-up" करा लवकर तुमच्या नावाखाली इथ असंतोष माजलाय ..... कारण पैशांच्या नोटातही आता  जहालपणा दिसू लागलाय..... म्हणून सांगतो क्रांतिकारकांनो  तुम्हाला वेड लागलाय का ?   तुम्ही भूतकाळात परत जा  आणि इतिहासच बदला ! म्हणजे भारत परत पारतंत्र्यात जाईल  -पंकज धुमाळ
  • आईच्या गर्भात असताना प्रत्येक मुलीला प्रश्न पडत असावा। मी का येवू जन्माला? राक्षस तैनात पृथ्वीवरती मला मारायला। काळजावरती दगड ठेवून जन्म जरी घेतला समाजाचे जावू द्या आई-वडील स्विकारतील का मला? आई ही एक स्त्री आहे ती हे का विसरते समाजाच्या बंधनाला बळी पडून स्त्रीभृणहत्या करण्यास प्रवृत्त का होते? परक्यांचे जावू द्या आपलेच झाले आपले वैरी समाजाची विकृती किती निकृष्ट दर्जाला गेली मुलाला वंशाचा दिवा मुलीला परक्याचे धन मानू लागली। मग, का येवू नये प्रश्न मनाला मी का येवू जन्माला? ना दिसत कुठे जिव्हाळा ना कुठे आपुलकी जो-तो पेटू लागला आपल्या वंशाचा दिवा। हिम्मत करून जन्म घेतला लग्नात हुंड्यासाठी बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला। कर्ज फेडता-फेडता मृत्यूला टेकला हे पाहण्यापेक्षा प्रश्न पडतो मनाला मी का येवू जन्माला? मी का येवू जन्माला? लेखक-अमीत पालवे
  • वाट तुझी पाहताना मन आतुर होते , तू समोर येताच हळूच हसू येते , डोळ्यात तुझ्या पाहताना हळूच लाज गाली येते , कशी सांगू तुला मी आठवण तुझीच येते , दूर तू जाताना मनात काहूर माजते , तू जवळ येताच मन हुरहूरते , का असे होते हे कळेना ना मला , हे कोडे उलगडून सांगशील ना मला , सतत तू जवळ असावा असे वाटते मला , वाट तुझी पाहताना मन आतुर होते , तुला पाहताच मी वेडी होते .                                                      -   प्राजक्ता निकुरे