कोण होतात तुम्ही क्रांतिकारक
आम्हाला माहित नाही
तुम्ही वेडे होतात का ?
की इंग्रजांनीच तुम्हाला तस सांगितलेलं !
तुम्ही क्रांति केलीत हे खर
पण त्याचा फायदा कोणाला
आमच्याकडे उत्तरही नाही
आणि उपाय तर नाहीच नाही
तुमची आठवण येते आम्हाला
इतिहासाच पुस्तक हातात घेतल्यावर....
पण तीसुद्धा आता दुर्मिळ झालीयेत
कारण अभ्यासक्रमातूनही तुम्हाला वगळलं जातायं....
चौकाचौकातील तुमचे पुतळे पाहून
मनाला थोड़ी शांती मिळते....
पण मनाची घालमेल
आजच्या तरुण पिढीच्या हास्यात दिसते....
तुम्ही अहोरात्र झटलात
दारुगोळीही बनवलेत
पण आजची दारुही वेगळी आणि गोळेही वेगळे
कारण त्या गोळ्यांचे आता अड्डे झालेत....
भगतसिंग तुम्ही म्हणाला होतात
"मेरा रंग दे बसंती चोला"
पण आता आम्ही म्हणतो
"हमारा रंग दे बसंती चोला"
आणि तुम्हाला निर्विवादपणे विसरूनही जातो
कारण स्वार्थ आमच्या अंगाला गोमेसारखा चिकटलाय...
भगतसिंग तुम्ही गाणचं बदलुन टाका
म्हणजे गांधीजी तुम्हाला ओरडणार नाहीत !
जाता जाता सुखदेव,राजगुरूंना
माझा एक निरोप दया
त्यांना म्हणावं एवढी जिवलग मैत्री करू नका बाबांनो !
फुकट जिव जाईल आणि हातात फक्त शूंन्य येईल
त्यापेक्षा त्यांना सांगा स्वार्थी व्हा आणि मस्त रहा..
"स्वराज्य है माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"
अशी घोषणा तुम्ही तुम्ही दिलीत खरी टिळक
पण आज स्वराज्यही नाही आणि हक्कासाठी कोणी भांडतही नाही
परिणामी विशेष अस मिळविण्याच्या भानगडित
आम्ही पडत नाही....
टिळक तुम्ही आणि गांधीजी "patch-up" करा लवकर
तुमच्या नावाखाली इथ असंतोष माजलाय .....
कारण पैशांच्या नोटातही आता
जहालपणा दिसू लागलाय.....
म्हणून सांगतो क्रांतिकारकांनो
तुम्हाला वेड लागलाय का ?
तुम्ही भूतकाळात परत जा
आणि इतिहासच बदला !
म्हणजे भारत परत पारतंत्र्यात जाईल
-पंकज धुमाळ