• Facebook Basic Black

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

Oct 30, 2017

"आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन"

0 comments

 

 

New Posts
  • Nandkishor Lele
    May 9
  • आज दोन दिवस झाले मी अजूनही माझ्या घरी गेलो नाही.माझ्या घरी सुद्धा पाहुणा आलाय पण,काय करणार तुमच्यासाठी, या समाजासाठी थांबाव लागत..काल घरी आलेला हा माझा पाहुणा आज आपल्या गावी परत जातोय.खंत एकाच गोष्टीची आहे की अजूनही त्या पाहुण्याला मला नीट भेटताही आलं नाही... होय मीच बोलतोय......महाराष्ट्र पोलीस.. गेली कित्येक वर्षे माझ्या घरी बाप्पा येतो.तोही फक्त दीड दिवसांसाठी पण या माझ्या बाप्पाच्या सेवेसाठी मला वेळच भेटत नाही. आता काही लोक म्हणतील वेळ काढावा लागतो म तो भेटतो..पण कस आहे...जेव्हा या सेवेत रुजू झालो ना तेव्हाच एक शप्पथ घेतली आहे की,."सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"..समाजासाठी, वेळप्रसंगी घरादाराला सोडून तुमच्यासाठी,तर कधी उपाशी पोटी मला माझं कर्तव्य करावं लागतं.. तुमच्या सारखं मला ही वाटत माझ्या लाडक्या बाप्पाला वाजतगाजत घरी आणावं, त्याची आरती करावी, स्वतःच्या हाताने त्याला मोदकांचा नैवैद्य दाखवावा, तितक्याच भक्तिमय वातावरणात त्याला निरोप द्यावा, पण हे असं काहीच घडणार नाही हे मला ही माहित आहे. पण,मी हाती घेतलेले हे व्रत माझं भाग्य समजतो आणि माझ्या लाडक्या बाप्पाचा आशिर्वादीरुपी प्रसाद...तुमच्या आमच्या सारखाच मी एक सर्वसामान्य माणूस आहे... मला ही घर आहे, संसार आहे, लेकरंबाळं आहेत पण या सर्व गोष्टींचा मी कधीच विचार केला नाही कधी करणार ही नाही.. कारण, मी स्वतःला या समाजासाठी झोकून दिल आहे. ही व्यथा फक्त माझ्याच बाबतीत नाही तर अशा एक ना अनेक माझ्या सारख्या "महाराष्ट्र पोलिसांची" आहे.खरं तर आम्ही सर्वच तुमच्यात कुठेतरी आम्हलाच शोधत असतो..या समाजाचे आम्हीच पोलीस नाही आहोत तर तुम्ही सुद्धा आहात...महाराष्ट्र पोलीस तो आहे जो प्रत्येकजण एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक आहे. महाराष्ट्र पोलीस सदैव तुमच्या सोबतच आहे फक्त गरज आहे ती तुमच्या साथीची कारण, टाळी हि नेहमीच दोन हाताने वाजते..वेळप्रसंगी याच टाळ्यांनी कौतुक होते तर कधी याच टाळीची मूठ बनून अन्याया विरुद्ध आवाज उठवते..आम्ही जागरूक आहोतच गरज आहे ती प्रत्येकाने आपल्या आजूबाजुला घडणाऱ्या बारीकबारीक गोष्टींकडे लक्ष्य ठेवायची.. कारण, तुम्ही जागरूक असला तर आम्ही निर्धास्त श्वास घेऊ शकतो..असो, सरतेशवटी तुमच्या संरक्षणासाठी या समाजासाठी आमचं हे शरीर झिजवणं हेच आमच ध्येय आहे...गणरायाच्या आगमनान सर्व वातावरण गणेशमय झालं आहे एक वेगळा उत्साह आणि आनंदमय रुपी उधाण निर्माण झालं आहे..आपला लाडका बाप्पा अजून काही दिवस आपल्या सोबत आहे..महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने मी बाप्पा जवळ एकच मागणं मागेन सर्वाना सुखी आणि आरोग्यदायी ठेव संकटांवर मात करण्यासाठी बळ दे.. आपल्या घरादाराला सोडून तुमच्या आमच्यासाठी, घरा बाहेर पडला पोलीस मामा उपाशीपोटी, अन्याया विरुद्ध लढण्यासाठी हाता मध्ये काठी, उन्हातान्हा मध्ये खाकीवाला उभा देवाच्या रुपामधी, कोणी निंदा तर कोणी वंदा पण, वेळेला हाच येईल खाकीवाला बंदा...
  • सर्वसामान्य वाचकांनी वाढविला डॉ. अरूणा ढेरे यांचा सन्मान... माध्यम पुरस्कृत साहित्यिकांना जोरदार चपराक यवतमाळ ९२ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाला उदंड प्रतिसाद... यवतमाळ येथे ११ ते १३ जानेवारी २०१९ रोजी भरलेले साहित्य संमेलन प्रचंड यशस्वी झाले. उद्घाटक वैशाली येडे यांच्या धडाकेबाज भाषणाने संमेलनाची दमदार सुरवात झाली. साहित्य विश्वातील अघोषित आणीबाणीला न जुमानता सर्वसामान्य रसिक वाचकांनी संमेलनाला अलोट गर्दी केली. महामंडळ आणि आयोजकांमधील कलगीतुरा, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा राजीनामा आणि तथाकथित मान्यवर माध्यमपुरस्कृत साहित्यिकांच्या असहिष्णू बहिष्काराने संमेलनादरम्यान अभूतपूर्व गोंधळात संमेलन होते की नाही असे वातावरण तयार झाले होते. मात्र मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या संपूर्ण राज्यातीलच नव्हे तर देशाच्या विविध भागातून यवतमाळ येथे पोहोचलेल्या हजारो प्रतिनिधींनी संमेलनामध्ये उत्साहाने भाग घेतला. संमेलनातील बहुतेक सर्व कार्यक्रमांना वाचक आणि श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. फक्त यवतमाळच नव्हे तर संपूर्ण विदर्भ, मराठवाडा परिघातील ग्रामीण वाचकांनी संमेलनाला गर्दी केली होती. ग्रंथप्रदर्शनामध्ये सुमारे दोन कोटींची झालेली विक्री हा संमेलन यशस्वीतेचा कळसाध्याय ठरला... संमेलनातील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे यवतमाळ येथील रिक्षाचालक बांधवांनी संमेलनाला आलेल्या सर्व रसिकांची एस.टी. स्टॅंड ते संमेलनस्थळ अशी येण्याजाण्याची निःशुल्क व्यवस्था केली होती. रिक्षाचालक बांधवांचे हे औदार्य वाखाणण्याजोगे होते. त्याचबरोबर यवतमाळ कॉलेजमधील एक तृतीयश्रेणी कर्मचारी श्री. मनिष अट्रावलकर यांनी शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी पदरमोड करून रू. २५,०००/- ची पुस्तके विकत घेतली आणि ग्रंथालयांना भेट दिली. खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थी आणि युवकांनी संमेलनाला भेट दिली. संमेलन म्हणजे काय ? त्याचे स्वरूप कसे असते ? त्यात कोणकोणते कार्यक्रम होतात ? ग्रंथ प्रदर्शन कसे भरते ? कवी कट्टा म्हणजे काय ? परिसंवादामध्ये कशा चर्चा झडतात ? हजारो युवक या सगळ्याची कुतुहलाने माहिती करून घेत होते. पुस्तकांच्या स्टॉलवर खूप गर्दी होती. ग्रामीण भागातील हे विद्यार्थी मोठ्या उत्सुकतेने पुस्तके पहात होते, ग्रंथावरून हात फिरवत होते. जणूकाही मांडलेली पुस्तके आणि ग्रंथ हे सुद्धा त्या स्पर्शाने मोहरून उठत होते, असे एकूण दृष्य होते. डॉ. अरूणाताई ढेरे यांच्या भाषणाने संमेलनाने एक अभूतपूर्व वैचारिक उंची गाठली. गेली काही वर्षे साहित्यबाह्य खटपटी आणि विविध भ्रष्ट मार्गांचा वापर करून संमेलनाचे अध्यक्ष झाल्याचा आरोप असलेल्या अध्यक्षांच्या पोचट भाषणांपेक्षा सर्वांगाने वेगळे, वर्तमानातील साहित्य विश्वातील समस्या आणि संधी यांचा उहापोह करणारे आणि पुढील काळाच्या मार्गक्रमणासाठी दिशादर्शन करणारे असे अत्यंत विलक्षण विचारमंथन अरूणाताईंनी केले. खरतर त्यांच्या या भाषणामध्ये दडलेल्या संचितावर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी चर्चासत्रांद्वारा मंथन होणे आवश्यक आहे. समारोपदरम्यान नितिन गडकरी यांनी केलेले मार्गदर्शनही खूप उद्बोधक होते. विविध परिसंवादामध्ये झालेल्या चर्चा विचार करायला लावणाऱ्या होत्या. विशेषतः डॉ. राणी बंग यांचा मुलाखतीचा कार्यक्रम फार अप्रतिम झाला. मराठीच्या नावाने गळा काढणाऱ्या, बोलघेवड्या, भोंदू आणि संकुचित मनोवृत्तीच्या बहिष्कारवादी साहित्यिक आणि माध्यमांच्या कंपूने लादलेल्या किळसवाण्या गदारोळाला कस्पटासमान लेखून सर्वसामान्य रसिक वाचकांनी हे संमेलन प्रचंड यशस्वी केले आणि एक नवीन आदर्श निर्माण केला. आपले वर्तन आणि कृती यातून त्यांनी डॉ. अरूणा ढेरे आणि मराठी भाषा, साहित्य संस्कृती यांचा गौरव वाढवला ही अत्यंत अभिमानाची बाब आहे असे नमूद करावेसे वाटते. प्रा. क्षितिज पाटुकले संस्थापक – साहित्यसेतू एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ www.sahityasetu.org व्हॉटस अप - 7066251262 कृपया हा संदेश अधिकाधिक रसिक वाचकांपर्यत पोहोचवण्यास मदत करा... त्यासाठी हा संदेश सर्व ग्रुप्स वर शेअर करा