• Facebook Basic Black

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

Aug 1, 2018

AARAKSHAN

2 comments

 

 

New Posts
  • आज मराठी भाषा दिन. बायकोचा वाढदिवस सोडला तर दुसरा कुठलाही दिवस लक्षात ठेऊ नये असा माझा समज. मात्र सकाळी – सकाळी WhatsApp वर मराठी भाषा दिनाच्या संदेशांचा भडीमार झाला. ते वाचून मराठी दरिद्री होत असल्याचही लक्षात आलं. तेच तेच संदेश चार-पाच लोकांनी पाठवलेले. हेच पुन्हा पुढल्या वर्षीही मिळतील याची खात्री. असो. मराठीचं भवितव्य काय, ती कशी टिकणार, इंग्रजीच आक्रमण या आशयाची चर्चा सतत होत असतेच. आज तर अशी चर्चा करण्याचा गोरज मुहर्त. इंग्रजीच्या अतिक्रमणामुळे राज्याच्या ७/१२ वर नाव लागलेली मराठी मरतेय असा सर्वसाधारण सूर. खरं तरं भाषा किंवा अन्य दिन साजरे करणा-या शहरातील संस्कृती रक्षकांसाठी मराठी केव्हाच कालबाह्य झालीय. वातानुकुलीत कार्यालयात, पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते. यांनीच मागील काही दशकात प्रमाण भाषेचं भुत तयार करून गावाकुसातल्या मराठीला दुय्यम भाषेचा दर्जा दिला. ग्रामीण भागातील लोकांना मराठीला अडगळीत टाकण्याची प्रेरणा दिली. असो. मराठी येवढया सहजासहजी कालबाह्य़ होईल? खरंच स्थिती एवढी वाईट आहे? थोडं मागं जाऊन पाहली तरं लक्षात येतं ही भीती अनाठायी आहे. 14 व्या शतकात दिल्लीच्या सुलतानाच्या अधिपात्याखाली राज्य गेलं. तेव्हा मराठी बोलणारे लोक राज्यात अत्यल्प होते (आजच्या तुलनेत). त्यांची नक्की संख्या किती याचा अंदाज बांधण कठीण आहे, मात्र ते सहा लाखांपेक्षाही कमी होते. मुद्रणाची यांत्रिक साधणं अपलब्ध नव्हती. साक्षरता नगण्य होती. यातच आदिलशाही, निजामशाहीच्या वरंवट्याखाली राज्य भरडलं जातं होत. सरकारी व्यवहार मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतून होई. अशाही परिस्थितीत पुढील चार शतकात संत परंपरा बहरली. अनेक उत्तम अशा ग्रथांची निर्मित्ती झाली. मोखिक पंरपरेनं जतन केलेल्या ग्रंथांच पुढे मोठ्या प्रमाणावर मुद्रन होऊ लागलं. मग सध्या मराठीला कशाचं ग्रहण लागलं आहे? सध्या राज्यात किमान ६ कोटी लोक मराठी बोलतात. मुद्रणाची साधणं लहान-लहान गावात उपलब्ध आहेत. मराठी ही राज्यभाषा आहे. टीव्ही, रेडीओ आहे. त्यावर अनेक मराठी वाहिन्या आहेत. मोबाईलचा प्रसार सर्वदूर झालाय. त्यावर अनेकांना मराठीतून संदेश लिहता येतात. मग सहा कोटी लोक जी भाषा बोलतात ती कशी नामशेष होईल? खरं तरं मराठी समाजाला नुन्यगडांन ग्रासलं आहे. आपली बलस्थानं काय आहेतं याची त्याला जाणीव नाही. उद्यमशीलता नसल्यांन बहुतांशी समाज नोकदार आहे किंवा शेतीवर अवलंबून आहे. इग्रंजी आलं तर नोकरीची कवाड उघडी होतीत या समजातून तो इंग्रजीच्या मागे धावतोय. पण हेच चित्र कायमस्वरूपी राहणारं नाही. काही दशकापूर्वी टंकलेखनाच्या जोरावर नोक-या मिळत होत्या. तो कालखंड मागे पडला. तसाच हा सध्याचा कालखंडही मागे पडेल. किंबहुना त्याची सुरूवातही झाली आहे. इंग्रजी येत असूनही अनेकजण बेरोजगार आहेत. इंग्रजी म्हणजेच नोकरी या समजाला जसा छेद जाईल तसे मराठी भाषेची पिछेहाट थांबेल. गरज आहे ती विविध क्षेत्रांमध्ये प्रस्थापित झालेल्या लोकांनी मराठी बोलण्याची. त्यांच्या बोलण्याने सामान्य जणांना आधार मिळेल. श्रीमंत इंग्रजी बोलतात हे पाहतं गरीब, मध्यमवर्ग त्यांच अनुकरण करू लागला. त्याची नेमकी उलटी प्रक्रिया सुरू केली गेली पाहीजे. ती मराठी भाषकांना आत्मविश्वास देईल. त्याच्यातून पुन्हा भाषा बहरू लागेल. कारण भाषेच्या प्रसारासाठी आवश्यक असणार तंत्रज्ञान उपलब्ध आहे व स्वस्तही.
  • का कुणास ठाऊक पण आज तुमच्याशी थोडं बोलावस वाटतय.खरं तर कित्येक वर्षांपासूनची ईछया होती पण आज तो योग आलाय.दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मी येतोय....माझी स्थापना करणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना वगळता आज तागायत मला अजूनही कळत नाही की माझी स्थापना तुम्ही का करता?खरं तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारन हाच तुमच्यासाठी मोठा प्रश्न आहे?...तुम्हाला आठवत नसेल पण मी सांगतो माझ्या स्थापनेचा मूळ कारण,आपण सर्वांनी एकत्र यावे हे होत. पण आज काही ठिकाणी सोडलं तर मला इतक्या वर्षानंतर ही हे कुठेच दिसत नाही.."एक गाव, एक गणपती" ही योजना खूप स्तूथ्य आहे पण ती सर्वांच्या विचारातच, विचारा स्वतःच्याच मनाला प्रश्न की अजूनही तुम्ही एकत्र आले आहात की नाही?जर आला असाल तर म ही स्पर्धा का आणि नसाल तर का नाही? आज प्रत्येक जण मागे लागलाय ते एकाच गोष्टीसाठी स्पर्धेसाठी?आमचा गणपती मोठा, आमचा आगमन सोहळा मोठा,आमचं मंडळ मोठं,आमच्या गणपतीला गर्दी मोठी, आमचा राजा,हा राजा,तो राजा?अरे का कशासाठी स्पर्धा आणि ती ही माझ्यासाठी माझं वेगळेपण,मोठेपण सिध्द करण्यासाठी मी एकच आहे ना म, इतका आतताही पणा का,कशासाठी काय मिळणार यातून, काय साध्य करणार यातून तुम्ही... मला नेहमी वाटत आलं की आज ना उद्या हे नक्की थांबेल पण कधी?कदाचित हा आज आणि उद्या उगवलाच नाही तर? पूजेच्या पाटाला पाय लागला तरी लगेच पाया पडणारे आपण,माझ्या मोठया मूर्तीच्या बाजूला उभं राहताना हे भान विसरलं जात का?..नाही हा प्रश्न सर्वस्वी तुमच्या श्रद्धेचा,भावनेचा आहे.मला किती उंच किती लहान आणायचं तो तुमचा प्रश्न आहे.. पण, एक सांगू माझ्या विसर्जनाच्या वेळी मला खूप त्रास होतो मला होणाऱ्या वेदना न समजण्या इतका माझा भक्त नक्कीच निष्टुर नाही..११ दिवस तुमच्या कडून होणाऱ्या सेवेने खरच मी खूप भारावून जातो.माझ्या विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाचे डोळे पाणावतात पण अजून ही विसर्जनाच्या दिवशी डॉल्बीच्या तालावर थिरकणारी तरुणाईची अश्लील नृत्य माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहावी लागतात,माझे कान सुपाएवढे असले तरी तुमच्या फटाक्यांच्या आवाजाने ते सुन्न होतात हे असं झालं तर तुमची गाऱ्यानी कोण ऐकणार आणि यातून होणार प्रदूषण व त्यामुळे माझ्या लांब सोंडेतून श्वास घेण्यासाठी मला होत असलेला त्रास असो,अशा एक न अनेक गोष्टी आहेत ज्या मला अजूनही बोलाव्याश्या वाटतात पण,कस आहे तुम्ही सर्व मला लंबोदर म्हणता म्हणून माझ्या या उदरात त्या सर्व साठून ठेवल्या आहेत.. आणि अजून एक मी कोणाचाच "राजा" नाही आहे, मी तुमचा फक्त मित्र आहे 'गणेशा'..मला तसच राहू दया ही एकच माझ्या भक्तांकडे माफक अपेक्षा आहे, सरतेशेवटी एकच सांगेन प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात स्वतःलाच प्रश्न विचारा आपण कुठे चुकतोय आणि काय करतोय..तुमचा बाप्पा तुमच्या सोबत कायम आहे पण, या सर्व गोष्टी जेव्हा बदलतील योग्य त्या पद्धतीने चालतील तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने म्हणू शकता "गणपती बाप्पा मोरया"..
  • " रमाचा वाढदिवस म्हणून लवकर काम आटपून ऑफिसातून निघालो. रमासाठी वाढदिवसानिमित्त साडी घ्यायची म्हणून एका दुकानात शिरलो. आत शिरल्यावर कुठली साडी घेऊ ह्याच वादात अडकलो. रमाला शोभेल अशी साडी घेतली आणि बाहेर आलो. त्याच रागेंत नाट्यगृह होतं.आजच्या धकाधकीच्या जीवनात नाटक सिनेमा पाहणे विसरूनच गेलो.रमा तरी कुठे बाहेर जाते म्हणा.घरातल्या कामांमधून वेळ मिळाला तर तेवढ्या साप्ताहिक सिरिअल्सचं असतात. लग्न झाल तेव्हाच काय ते नाटक पाहिल.सध्या आई-बाबा कोकणात गेले होते.केतन मावशीकडे गेलेला. आज बऱ्याच वर्षानंतर एकांत मिळणार होता. पुन्हा एकदा रमा सोबत नाटक पाहूया असं मनोमन ठरवल आणि शिरलो शिवाजी मंदिरच्या प्रांगणात.आजच्या घडीला अनेक दर्जेदार नाटक येतायत, असं सचिनकडून कळलं होत.त्यालाच विचारून एका नाटकच तिकीट घेण्यासाठी खिडकीवर गेलो.नाटकाला आलेली गर्दी पाहून आनंद झाला. ‘ह्या नाटकाच्या आजच्या प्रयोगाची २ तिकीट द्या.’ नोकरी लागली तेव्हा सुद्धा इतका आनंद झाला नव्हतां तेवढा आज झाला.इतक्या गर्दीत मला नाटकाची तिकीट मिळाली होती.आज काहीहि झाल तरी रमाला नाटक दाखवायचचं.छबिलदासच्या इथून चालत घाई घाईत एकदाचा पोहचलो इमारतीच्या गेटवर.एका हातात बैग, दुसर्या हातात साडीची पिशवी आणि शर्टाच्या खिशात नाटकाची २ तिकीट. गेट मधून आत येताच तळमजल्यावर जोशी नाना भेटले. ‘आज स्वारी खुशीत दिसतेय..’मी फक्त हसलो आणि पुढे निघालो.तिसऱ्या मजल्यावर पोहचलो.घरात पाय ठेवणार इतक्यात बाजूच्या माने आज्जी घरात शिरताच म्हणाल्या, ‘बर झाल लवकर आलास..सर्वजण तुझीच वाट बघत थांबलेत.’ मला काहीच कळत नव्हत. ’अरे विसरलास का..आज रमाचा वाढदिवस नां म्हणून आम्ही चाळीतल्या सर्वांनी मिळून केक आणलाय आणि रात्री मटणाच जेवण तुझ्याच घरी करणार आहोत.मी आत शिरुन पाहतो तर अख्खी चाळ माझ्या १० बाय १० च्या खोलीत सजलेली दिसत होती. खिशातली २ तिकीट मात्र घामाने भिजलेली आणि रमा मात्र माझ्याकडे पाहून फक्त हसत होती....एकटीच. #WritersLove2526