महाराष्ट्र शासन-शिक्षण संचलनालय (उच्च शिक्षण) प्रमाणित महाविद्यालयीन युवकांसाठी

कौशल्य व क्षमता विकास कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम

कार्यशाळा प्रशिक्षण प्रस्ताव - शासनाकडे सादर केलेला प्रस्ताव

साहित्य सेतू

६२२, जानकी-रघूनाथ, पुलाचीवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे  ४११००४

मोबाईल – ९८२२८४६९१८   ई - मेल : - patukalesir@gmail.com

१२ / ११ / २०१८

 

प्रति,

मा. श्री. विनोदजी तावडे साहेब

मा. मंत्री – शालेय, उच्च तंत्र, शिक्षण, मराठी भाषा, युवक कल्याण, सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य,

१०८, मंत्रालय, मुंबई

विषय – महाविद्यालयीन युवकांसाठी क्षमता व कौशल्य विकास यासाठी विविध विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये  ४ ते ६ तासांच्या कार्यशाळा उपक्रम आयोजित करण्याबाबत...

 

महोदय,

            भारत हा युवकांचा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखळा जातो. या युवकांमध्ये सामर्थ्य, क्षमता, कौशल्य आणि शहाणीव विकसित करणे ही आत्ताची सर्वात मोठी गरज आहे. साहित्य सेतूने या विषयांवर सखोल चिंतन, अभ्यास आणि विविध तज्ञ अभ्यासकांबरोबर चर्चा आणि विचार विनिमय केला आहे. त्या मंथनातून आम्ही आपल्यासमोर महाविद्यालयीन युवकांसाठी क्षमता व कौशल्य विकास यासाठी विविध विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये ४ ते ६ तासांच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत.

कार्यशाळांचे विषय पुढील प्रमाणे असतील-

 1. कौशल्ये आणि क्षमता विकसनाचे तंत्र आणि मंत्र.

 2. करिअरचा शोध आणि दिशा.

 3. उद्योजकता आणि व्यावसायिक कौशल्ये विकसन.

 4. व्यक्तीमत्व विकसन आणि जीवनमूल्यांची ओळख.

 5. यशस्वी लेखक/ ब्लॉगर/ अनुवाद/ ई-बुक, किंडल बुक इ.

 6. तारूण्याचा विकास आणि जीवनाची ध्येय निश्चिती इ.

 7. योग, खेळ आणि आरोग्य

 8. आर्थिक साक्षरता

 9. सकारात्मक जीवनदृष्टी

 10. नागरिकांची कर्तव्ये आणि अधिकार

 

प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या नेतृत्वाखाली पुढील तज्ञ अभ्यासक लेखक यांनी यासाठी संकल्पना आणि अभ्यास साहित्य तयार केले आहे.१) प्रा. क्षितिज पाटुकले २) श्री. विवेक वेलणकर ३) श्री. ज्ञानेश पुरंदरे ४) सौ. प्रांजली फडणवीस ५) श्री. अनिल अकोळकर ६) श्री विनय पत्राळे ७) श्री. नंदकुमार दिवटे ८) श्री. प्रमोदजी डोर्ले ९) प्रा. अनिकेत पाटिल १०) डॉ. भाग्यलता पाटसकर, इ.

एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणाऱ्या साहित्य सेतूची स्थापना प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केली आहे. साहित्य सेतू बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील १० हजाराहून अधिक लेखक / कवी / साहित्यिक / तज्ञ / अभ्यासक वैयक्तिक मोबाईल, व्हॉटस अप, ई-मेल व सोशल मीडियाद्वारे जोडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळा शासनाच्या सहकार्याने आम्ही रावबू इच्छितो. साहित्य सेतू आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया या माध्यमातून अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. अधिक माहितीसाठी कृपया www.sahityasetu.org   या संकेतस्थळाला भेट द्या, ही विनंती.

येत्या १० वर्षामध्ये लाखो युवकांच्या जीवनांमध्ये वरील उपक्रमांद्वारे उपयुक्त सक्रीय सकारात्मक बदल घडविण्याचे साहित्य सेतूचे ध्येय आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थांच्या क्षमता, दृष्टीकोन आणि कौशल्ये यामध्ये आमुलाग्र विधायक बदल घडून येईल असा आम्हाला विश्वास वाटतो.

शासनाने विविध विद्यापीठांच्या माध्यमातून या उपक्रमाला पाठबळ द्यावे आणि युवकांच्या जीवनाला विधायक दिशा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती.

आपला नम्र,

प्रा. क्षितिज पाटुकले

कार्यशाळा आयोजित करण्याबाबत महाविद्यालयासाठी पत्र

 

प्रति,

मा. प्राचार्य / विद्यार्थी विकास अधिकारी.

-----  महाविद्यालय

 

संदर्भ -: i)  शिक्षण सहसंचालक, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र शासन ( उच्च शिक्षण ) पत्र क्र. उशिसं / साहित्य सेतू / विशि. १/२०१८ / ५९५५  दि. १०/०४/२०१९

ii)  विद्यापीठाचे पत्र

 

विषय -: महाविद्यालयीन युवकांसाठी क्षमता व कौशल्य विकास कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे बाबत..

 

सप्रेम नमस्कार वि.वि.

    मा. शिक्षण सहसंचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन यांचे आणि आपल्या विद्यापीठाचे पत्र आम्हाला प्राप्त झाले आहे. (त्याची प्रत सोबत जोडली आहे) या उपक्रमा अंतर्गत आपल्या महाविद्यालयातील सर्व युवकांसाठी क्षमता व कौशल्य विकास कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. त्याची थोडक्यात रूपरेषा आणि माहिती खालील प्रमाणे आहे.

१) प्रत्यक्ष प्रशिक्षण - ६ तास ( सकाळी ११ ते संध्याकाळी ५.३० ) ९० मिनिटांची चार सत्रे

२) स्वयं अध्ययन आणि  मूल्यमापन - ६ तास

३) ऑनलाइन असाईनमेंट आणि परीक्षण - ३ तास

 

एकूण कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रम - १५ तास 

 

अन्य तपशील

अ) प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षण साहित्य पुस्तिका ( स्टडी किट ) दिली जाईल.

ब) तसेच असाईनमेंट प्रकल्प प्रश्न दिले जातील.  ते त्याने ऑनलाइन सबमिट करायचे आहेत.

क) प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

ड) या अवांतर शैक्षणिक अर्हता प्राप्तीसाठी त्याला एक क्रेडिट अदा केले जाईल.

इ) कार्यशाळा विषयक वाचन साहित्य आणि इतर मार्गदर्शन संस्थेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिले जाईल.

फ) प्रत्येक महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षक प्रत्यक्ष कार्यशाळा घेणार आहेत. प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

ग) या संपूर्ण कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यापीठ / महाविद्यालयाने आर्थिक सहयोग करावा. आर्थिक सहयोगामध्ये प्रशिक्षकांचे मानधन, प्रवास व्यवस्था, आवश्यक तिथे निवास व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य ( स्टडी किट ), विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि परीक्षण, प्रमाणपत्र, ऑनलाइन कन्टेन्ट उपलब्धी इत्यादी अनुषंगिक खर्च यांचा समावेश असेल.

 

आपल्या महाविद्यालयाकडून खालिल सहकार्य  हवे आहे.

१) महाविद्यालयातील  सर्व विद्यार्थांना कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्याची व्यवस्था. २) प्रशिक्षणासाठी सर्व विद्यार्थी बसू शकतील असा हॉल, ध्वनीक्षेपक आणि इतर आनुषंगिक व्यवस्था.

३) प्रशिक्षणादरम्यान आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य उदा. प्रशिक्षण साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांची नोंदणी इ.

४) विद्यार्थ्यांची बरोबर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा.

५) विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण.

६) कार्यशाळा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आर्थिक सहयोग इ.

 

हा उपक्रम आपल्या महाविद्यालयातील युवकांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक/ उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ज्ञान कौशल्ये प्रदान करणारा असेल असा विश्वास वाटतो.

 

कृपया या उपक्रमासाठी आपली स्वीकृती 7066251262 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारा तसेच esahityasetu@gmail.com या ईमेलवर कळवावी, ही विनंती. आपल्या सोयीनुसार तारीख नक्की करून ही कार्यशाळा आपण लवकरात लवकर आयोजित करूया.

कृपया सहकार्य करावे ही  नम्र विनंती.   कळावे.

आपला नम्र,

प्रा. क्षितिज पाटुकले  --  संस्थापक-अध्यक्ष - साहित्य सेतू

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

 • Facebook Basic Black