आपल्या उपक्रमाची बातमी लाखो मराठी बांधवांपर्यंत थेट पोहोचवणारी साहित्य सेतूची   

ई – मीडिया सेवा (eMedia Service)

     

    भाषा,  साहित्य, संस्कृती आणि सामाजिक उपक्रमांची माहिती देशविदेशातील मराठी वर्तमानपत्रे,  ई – वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके आणि लाखो वैयक्तिक वाचकांपर्यंत पोहोचवणारी अभिनव “ ई–मीडिया ” सेवा साहित्य सेतूने सुरू केली आहे. ही सेवा सशुल्क आहे. “ एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक ” यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ साहित्य सेतूने सुरू केली आहे. साहित्य सेतूद्वारा मराठी भाषेतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, ई – न्यूजलेटर्स, संवाद समूह, माध्यम समूह, ऑनलाईन कम्युनिटी आणि वैयक्तिक रसिक वाचक यांचे इंटरनेट आणि बरोबरच सोशल मीडियाद्वारे जोडले गेलेलो आहोत. त्या सेतूचा उपयोग करून हे मुक्त संवाद संपर्काचे अवकाश आम्ही आपल्यासाठी खुले करीत आहोत. आता आपली बातमी ई मीडिया सेवेद्वारे भुगोलाच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण विश्वामध्ये सर्वदूर लाखो मराठी रसिक वाचकांपर्यंत पोहोचेल.

    महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असून भारतातील इतर राज्यांत राहणा-या मराठी भाषिकांची संख्या २.५ कोटींच्या आसपास आहे. परदेशांमध्ये राहणारे मराठी भाषिक ५० लाखांपर्यंत आहेत. अशा प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये साधारणपणे १५ कोटी मराठी बांधव आहेत. मराठी भाषिक बांधव संपूर्ण जगामध्ये विविध ठिकाणी अनेक उपक्रम राबवतात. त्यांची माहिती सर्व समाजाला करून देणे तितकेच आवश्यक आहे. उदा. पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, पुरस्कार प्रदान, विविध प्रकारच्या स्पर्धा, कविसंमेलने, संगीत, नाट्य, गायनाचे कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, सामूहिक धार्मिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, गुरुचरित्र पारायण, प्रकाशनपूर्व सवलती, जागृती उपक्रम, युवकांचे उपक्रम, कार्यशाळा, शिबिरे, ट्रेक, जत्रा, यात्रा, उत्सव, हेरिटेज टूर्स, गिर्यारोहण, किल्ले भ्रमंती, पर्यावरण, जैवविविधता, प्रदर्शने इ.

   या उपक्रमांची माहिती अर्थात प्रेसनोट उपक्रमाआधी आणि उपक्रमानंतर वर्तमानपत्रांना दिली जाते. त्यासाठी वर्तमानपत्राच्या कार्यालयांमध्ये जाऊन हाताने लिहिलेला किंवा टाईप केलेला मजकूर दिला जातो. ज्या शहरामध्ये कार्यक्रम होतो, तेथील वर्तमानपत्रांकडे बातमी दिली जाते. परंतु इतर शहरांमध्ये तसेच वैयक्तिक रुची असणाऱ्या वाचकांपर्यंत आपला उपक्रम आणि त्याची माहिती पोहोचत नाही. कोल्हापूरात होणाऱ्या उपक्रमांची माहिती कोल्हापूर सांगली परिसराबाहेर नसते. विदर्भातील बातमी कोकणात कळत नाही. मराठवाड्यातील बातमी खानदेशात पोहोचत नाही. हैदराबाद, बडोदा, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद, बिलासपूर, पणजी, बेळगाव येथील मराठी माणसे काय करतात, याचा कुणालाच पत्ता लागत नाही. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, आखातातील मराठी बांधव काय करतात ते गडहिंग्लज, परतवाडा, खटाव आणि कन्नड, इ. तालुक्यातील मराठी बांधवांना कदाचित आयुष्यात कधीच कळत नाही..! १५ कोटी मराठी भाषिकांपर्यंत पोहोचणे सहजसोपे नाही. पण ई – मीडियाद्वारे आपल्या उपक्रमांची माहिती लाखो व्यक्तींपर्यंत नक्कीच पोहोचू शकेल.

ई – मीडिया सेवा म्हणजे काय ? 

आपल्या उपक्रमाची बातमी / माहिती ई माध्यमांद्वारे थेट पोहोचवली जाते.

   १. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे

   २. महाराष्ट्रातील संबंधित विषयांची नियतकालिके आणि मासिके

   ३. देशातील इतर राज्यांतील मराठी भाषेतील नियतकालिके

   ४. विदेशातील मराठी भाषेतील नियतकालिके

   ५. ई – वर्तमानपत्रे,  ई – न्यूजलेटर्स,  ई नियतकालिके, ई – माध्यमे

   ६. एक लाखाहून अधिक रसिक वाचकांना त्यांच्या ई - मेलवर

   ७. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉटस अप इ. द्वारा लाखो रसिक वाचकांपर्यंत

 

ई – मीडिया सेवा कुणासाठी ?

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील, देशातील इतर राज्यांतील आणि विदेशातील

१) लेखक / वक्ते / कवी / कलाकार     २) प्रकाशक      ३) सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक         ४) व्याख्यानमाला आयोजक    

५) पुरस्कार प्रदान संस्था        ६) कवी संमेलने       ७) नाट्य – कविता स्पर्धा,         ८) विविध कार्यक्रम / उपक्रम आयोजक.

ई – मीडिया सेवेसाठी आपली बातमी / माहिती आमच्यापर्यंत कशी पाठवावी ? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशातील इतर राज्यांतून आणि विदेशातूनही आपण या सेवेचा लाभ घेऊ शकता.

   १.युनिकोडमध्ये टाईप करून आमच्या ईमेलवर पाठवा.

   २. व्हॉटस अपवर टाईप करून पाठवा. 

   ३. हाताने लिहून त्याचा फोटो काढून व्हॉटस अप किंवा ईमेलवर पाठवा.

   ४. हाताने लिहून किंवा टाईप करून  आमच्या कार्यालयामध्ये आणून द्या.

   ५. आपल्या बातमी / माहिती सोबतचे  फोटो / चित्रे स्कॅन करून ई-मेलवर किंवा व्हॉटस अपवर पाठवा.

 

ई – मीडिया कसे काम करते ?

   १. आपली बातमी / माहिती तपासून घेतली जाते.

   २. आवश्यकता असेल तर संपादित केली जाते.

   ३. शुद्धलेखन तपासले जाते.

   ४. टाईप केलेली नसल्यास युनिकोडमध्ये टाईप केली जाते.

   ५. बातमी / माहिती फोटोसह संबधित वृत्तपत्रे / नियतकालिके यांना इंटरनेटच्या माध्यमातून पाठवली जाते.

   ६. सोशल मीडियामध्ये शेअर केली जाते.

 

ई – मीडिया सेवेचे शुल्क  किती आहे ?

रु.१२००/- ( रूपये एक हजार दोनशे फक्त ) - एका वेळी एका बातमी / माहिती साठी 

 

नियम व अटी

१)  ई मीडिया सेवेचे शुल्क रोखीने किवा चेकने आमच्या कार्यालयामध्ये भरता येईल. आपल्या शहरातील बॅकेमध्ये  जाऊन आमच्या खात्यामधे रोखीने / चेक द्वारा  भरता येईल. ऑनलाईन NEFT / UPI / PayTm द्वारे भरता येईल. आमच्या वेबसाईटवर जाऊन क्रेडीट / डेबिट कार्ड / नेट बॅकिंगद्वारा भरता येईल.

२) आपली बातमी / माहिती  आणि शुल्क मिळाल्यावर ३ ते ४ दिवसांमध्ये  ई माध्यमातून पाठवली जाईल.

३) आपली बातमी / माहिती विविध माध्यमांकडे पोहोचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. ती वर्तमानपत्रांमध्ये छापून येईल याची कोणतीही खात्री किंवा हमी देता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मात्र सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांपर्यंत ती नक्की पोहोचेल.

४) कृपया ई मीडिया सेवेची कार्यपद्धती नीट समजावून घ्यावी. कोणतीही शंका विनासंकोच विचारावी. पूर्ण समाधान झाल्यावरच या सेवेचा लाभ घ्यावा. एकदा भरलेली रक्कम कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही. किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

५)  सर्व प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रियेची मर्यादा पुणे शहर न्यायालयीन सीमा ही राहील.

 

ई - मीडिया सेवेचा लाभ कसा घ्यावा ?

१) ई मीडिया सेवा आणि कार्यपद्धती नीट समजून घ्यावी.

२) ई मीडिया सेवेचा नोंदणी अर्ज भरून द्यावा. हा अर्ज ऑनलाईन भरता येईल किंवा व्हॉटसअप वर फोटो काढून किंवा ई मेलद्वारेही पाठवता येईल.

३) सेवेचे शुल्क जमा करावे.

४)  आपली बातमी / माहिती  फोटो / चित्रांसह पाठवावी.

 

संपर्क

साहित्य सेतू

६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिज जवळ, ऑफ जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४ 

फोन – ( ०२० ) २५५३०३७१ / २५५३४६०१   ई-मेल -  office@sahityasetu.org

अनिकेत पाटील - ७५०७२०७६४५ 

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black