महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

लेखन कार्यशाळा

        एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडण्याचा संकल्प केलेली ‘साहित्य सेतू’ ही एक अभिनव साहित्य चळवळ आहे. १५ कोटी मराठी बंधू - भगिनींसाठी भाषा, साहित्य आणि संस्कृतिविषयक माहितीचे आणि कौशल्यांचे आदानप्रदान करणे आणि त्यांना संधी आणि व्यासपीठ निर्माण करून देणे हा  साहित्य सेतूचा मुख्य उद्देश आहे.

     गेल्या काही वर्षांमध्ये तर तंत्रज्ञान आणि आधुनिक मीडियाने साहित्यविश्वाचा चेहरामोहरा पार बदलून टाकला आहे. एकीकडे वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे असे म्हटले जाते तर दुसरीकडे ई – बुक आणि सोशल मीडियावर दमदार अभिव्यक्तीचे कोंब फुटताना दिसत आहेत. विशेषतः युवापिढी यात आघाडीवर आहे. तरीही त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. माहितीचा आणि अभ्यासाचा अभाव तसेच मार्गदर्शनाची कमतरता यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. कसदार लिहिणारे साहित्यिक आणि  सजग वाचक ही काळाची गरज आहे. याचा विचार करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि ‘साहित्य सेतू’ या दोन संस्थांनी एकत्र येऊन लेखनविषयक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या कार्यशाळा सशुल्क असतील. कार्यशाळांचे विषय आणि तारखा खालीलप्रमाणे – 

१) यशस्वी व्यावसायिक लेखक कसे बनावे?

२) कथालेखन कसे करावे ?

३) कादंबरीलेखन कसे करावे ? 

४) ब्लॉगलेखन कसे करावे ? 

५) कविता आणि गझललेखन कसे करावे?

६) अनुवाद कसा करावा?

७) साहित्य रसग्रहण

८) ऑनलाईन बुक स्टोअर 

०८ मार्च २०२०

२२ मार्च २०२०

०५ एप्रिल २०२०

१९ एप्रिल २०२०

२६ एप्रिल २०२०

०६ मे २०२०

१० मे २०२०

१७ मे २०२०

मान्यवर मार्गदर्शक : डॉ. अरुणा ढेरे, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. क्षितीज पाटुकले, अनिल कुलकर्णी, अतुल कहाते, शिवराज गोर्ले, नीलिमा गुंडी, मनोहर जाधव, मुकुंद संगोराम, डॉ. सदानंद बोरसे, भारत सासणे, निलीमा बोरवणकर, राजेंद्र माने, मंगलाताई गोडबोले, राजेन्द्र खेर, संजय सोनवणी, विलास वरे, भानू काळे, भाऊ तोरसेकर, तृप्ती कुलकर्णी, मुकुंद कुळे, ओंकार दाभाडकर, व्यंकटेश कल्याणकर, उमा कुलकर्णी, भारती पांडे, चेतन कोळी, अभिजित थिटे,  म. भा. चव्हाण, प्रा. आदित्य दवणे, राजन लाखे, अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन इ.  

कार्यशाळेचे शुल्क :

कार्यशाळांसाठी सहभाग शुल्क : प्रत्येक कार्यशाळेसाठी रु.१५००/- प्रति व्यक्ती

आणि २५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यां महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शुल्क : रु.१२००/-  प्रति व्यक्ती

 

कार्यशाळेचे स्थळ :

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉरमिंग आर्टस, मएसो भवन, हॉटेल दुर्वांकुर शेजारी,

सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे-३०

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black
Mangala Godbole