भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांत काम करणारी आद्य साहित्य संस्था म्हणजे ‘महाराष्ट्र साहित्य परिषद,  पुणे’ ही होय. मराठी साहित्य निर्मिती, प्रचार, प्रसार आणि समन्वय या क्षेत्रांमध्ये गेली ११० वर्षे काम करीत असल्यामुळेच साहित्य क्षेत्रांतील सबंधित घटकांच्या गरजा आणि समस्या यांचे अध्ययन आणि ऊहापोह सुरू असतो. लेखक, कवी, चित्रकार, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, समीक्षक, ग्रंथालये, पत्रकार, साहित्य / कवी संमेलनांचे आयोजक इ. अनेक घटक साहित्य निर्मितीच्या व्यवहाराबरोबर जोडले गेलेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तर तंत्रज्ञान आणि आधुनिक मीडियाने साहित्यविश्वाचा चेहरामोहरा पार बदलून टाकला आहे. एकीकडे वाचनसंस्कृतीचा ऱ्हास होत आहे असे म्हणताना दुसरीकडे ई – बुक आणि सोशल मीडियावर दमदार अभिव्यक्तीचे पेव फुटलेले दिसते. विशेषतः युवापिढी यामध्ये आघाडीवर आहे. मात्र तरीही आपल्याकडे स्वतंत्र व्यावसायिक लेखक निर्माण झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याला अनेक कारणे आहेत. त्यामध्ये माहितीचा अभाव, व्यावसायिकतेकडे दुर्लक्ष आणि मार्गदर्शनाची अनुपलब्धता ही तीन मुख्य कारणे आहेत. याचा सर्वंकष विचार करून ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ’ आणि ‘ एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडण्याचा संकल्प केलेली साहित्य सेतू’ या तीन संस्थांनी एकत्र येऊन साहित्यविषयक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या कार्यशाळा सशुल्क असतील. कार्यशाळांचे विषय आणि तारखा खालीलप्रमाणे – 

 OPENING HOURS

MONDAY - FRIDAY 11:00 - 18:30 SATURDAY 11:00 - 17:00

SUNDAY 12:30 - 16:30 

ADDRESS

500 TERRY FRANCOIS STREET

SAN FRANCISCO, CA 94158

INFO@MYSITE.COM | TEL.123-456-7890

  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon
  • Pinterest Social Icon
  • Instagram Social Icon

  Sahitya Setu, Pune.    Contact : 7066251262  

  • Facebook Basic Black